आरोप
भगतसिंगांनी फाशी स्वीकारली पण सावरकरांनी माफी मागितली.
वस्तुस्थिती
मुळात फाशीची शिक्षा झालेल्यांना सुटका अर्ज करण्याची परवानगीच नव्हती. त्यामुळे हुतात्मा भगतसिंगच काय पण अशा कोणाचेच अर्ज नाहीत.परंतु आज हे विकृत काँग्रेसी क्रांतिकारकांमध्ये पण भेद करत आहेत.
सावरकर विरुद्ध भगतसिंग!
पण सर्व क्रांतिकारकांना एकमेकांच्या कार्याची जाण होती. एकमेकांविषयी प्रचंड आस्था होती.
विश्वप्रेम’ हा बलवंतसिंह या टोपणनावानं प्रसिध्द झालेला भगतसिंग यांचा लेख ‘मतवाला’च्या दोन अंकांमध्ये १५ नोव्हेंबर १९२४ आणि २२ नोव्हेंबर १९२४ छापला गेला होता. त्यात ते सावरकरांबद्दल लिहितात, “विश्वप्रेमी तो वीर आहे, ज्याला भीषण क्रांतिकारक, कट्टर अराज्यवादी म्हणायला आम्ही लोक जरादेखील लाजत नाही – तेच वीर सावरकर. विश्वप्रेमाच्या लाटांवरून येऊन चालता चालता कोवळे गवत पायाखाली चिरडणार तर नाही ना, म्हणून ते थांबत.”
७ सप्टेंर १९३० ला भगतसिंग, सुखदेव, आणि राजगुरू यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. २३ मार्च १९३१ या त्या तिघांच्या फाशीच्या दिवसापर्यंत त्यांची फाशीची शिक्षा कमी व्हावी यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जेष्ठ बंधू गणेश दामोदर उपाख्य बाबाराव सावरकर धडपड करत होते. १९३० ची चळवळ थांबविण्यासाठी गांधी आयर्विन करार होणार होता. त्यापूर्वी बाबारावांनी गांधींजींची भेट घेतली. बाबाराव गांधीजींना म्हणाले, “सविनय कायदेभंगाची चळवळ थांबविण्यासाठी आपल्यात आणि व्हॉईसरॉय यांच्यात जो करार होईल त्यात राजबंद्यांच्या मुक्ततेची पहिली मागणी असावी. त्यात अत्याचारी आणि अनात्याचारी असा भेद केला जाऊ नये.” यावर गांधीजी म्हणाले, ‘अत्याचारी लोकांना सोडा म्हणणे हीनपणाचे आहे, ते मी करणार नाही. माझ्या अहिंसेच्या ब्रीदाविरुद्ध कसा जाऊ? यावर बाबारावांनी गांधीजींना प्रतिप्रश्न केला, “अत्याचारी राजबंद्यांना सोडणं आपल्याला हीनपणाचं वाटतं, मग स्वामी श्रद्धानंदांची हत्या करणाऱ्या ‘भाई अब्दुल रशीदला माफ करा असं आपण हिंदुसमाजाला आणि स्वामीजींच्या मुलाला म्हणालात तो हीनपणा नव्हता का??’ यावर उत्तर न देता गांधीजी निघून गेले.
बाबांनी त्यांना रजिस्टर्ड पत्र पाठवले त्यालाही गांधींनी ‘अत्याचारी राजबंद्यांच्या सुटकेची मागणी करणे मी हीनपणाचे समजतो’ असंच उत्तर आलं.
भगतसिंग, सुखदेव, राजगुरू या क्रांतिकारकांन फाशी झाली आणि मगच गांधी आयर्विन करार झाला, सविनय कायदेभंगातल्या सगळ्यांची सुटका झाली. पण देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या भगतसिंग, सुखदेव, राजगुरू या क्रांतिकारकांची सुटका झाली नाही.
लोकांच्या दबावामुळे गांधींनी त्या तिघांच्या सुटकेची मागणी केली पण ती मान्य झाली नाही. पण त्यांचे प्रयत्न किती मनापासून असतील ते सांगायला गांधींजींची वाक्य पुरेशी आहेत. गांधीजी म्हणतात “गेल्या वर्षात कैद झालेले सत्याग्रह-कैदी सुटतील त्यावेळी माझे दुसरे मित्र शस्त्राचारी राजबंदी तुरुंगातच खितपत राहतील. तुरुंगवास ही शिक्षा आहे असे मला मुळीच वाटत नाही. अत्याचारी लोकांना सुद्धा ती शिक्षा नाही. परंतु मला त्यांच्या ( शस्त्राचारी राजबंद्यांच्या) मुक्ततेचे न्याय्य समर्थन करता आले नाही. त्यांनी आपल्या अत्याचारी चळवळीपासून परावृत्त व्हावे असे मी त्यांना पुन्हा सांगतो.”
थोडक्यात भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांना गांधीजींनी फाशी जाऊ दिले.
भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांना फाशी दिलं तेव्हा स्वातंत्र्यवीर सावरकर रत्नागिरीत स्थानबद्ध होते. त्या बातमीनंसावरकर अतिशय अस्वस्थ झाले.त्यांच्याफाशीच्यादुसर्यारच दिवशी पोलीस जागे होण्याआधीच तिथल्या तरुणांनीसावरकरांनी लिहिलेलं गीत गात गावातून प्रभातफेरीही काढली. भगतसिंग आणि स्वातंत्र्यलक्ष्मीचा जयजयकार करत रत्नागिरी दणाणून सोडली.
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या ‘1857 चं स्वातंत्र्यसमर’ या पुस्तकानं भगतसिंग अतिशय प्रभावित झाले होते. 1928 मध्ये निधी संकलनासाठी भगतसिंगांनी या ग्रंथाची भूमिगत आवृत्ती काढली होती. तो ग्रंथ त्याकाळी तीनशे रुपयांना विकला जात होता.ते या ग्रंथाला ‘क्रांतिकारकांची गीता’ म्हणत.